Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

माणुसकीला काळिमा : अहमदनगरमध्ये विवाहितेवर दोनदा सामूहिक बलात्कार

Defamation of humanity: Twice gang rape of a married woman in Ahmednagar माणुसकीला काळिमा : अहमदनगरमध्ये विवाहितेवर दोनदा सामूहिक बलात्कार Maharashtra News Regional Marathi News  Webdunia Marathi
, रविवार, 31 ऑक्टोबर 2021 (16:23 IST)
राज्यात सध्या बलात्काराचे सत्र सुरूच आहे. अहमदनगर येथील नेवासा तालुक्यातील रामडोह येथे माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. इथे एका विवाहित महिलेवर चार जणांनी दोन वेळा सामूहिक बलात्कार करून तिला शारीरिक यातना दिल्या. विवाहित महिले ने आरोपीच्या विरोधात जीवे मारण्याची धमकी देणे आणि शारीरिक अत्याचार केल्याची तक्रार नेवासा पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. 

महिले ने सांगितले की , तीन महिन्यापूर्वी महिलेचे पती, मुलगी आणि सासरे कामानिमीत्त बाहेर गेले असता विवाहितेला घरात एकटी बघून चारही आरोपी बळजबरी घरात शिरले आणि महिलेच्या तोंडात रुमाल कोंबून तिच्यावर बलात्कार केला. एवढेच नाही तर या घटनेची वाच्यता कुठे ही केली तर तुला ठार मारू अशी धमकी दिली. महिलेने घाबरून घडलेलं कुठेही सांगितले नाही. महिला माहेरी गेली असता आरोपींनी तिला फोन करून धमकावले. हा सगळा प्रकार तिचा माहेरी समजला. नंतर आठ दिवसापूर्वी पीडित महिला शेतात एकटी झोपलेली होती. तिथे हे आरोपी पोहोचले आणि तिचे हातपाय बांधून तिच्यावर पुन्हा बलात्कार केला. अखेर त्या आरोपींच्या त्रासाला कंटाळून तिने पोलीस ठाण्यात जाण्याचे ठरविले आणि त्या चारही आरोपींच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी सामूहिक बलात्कार करणारे संतोष अप्पासाहेब गढेकर, शिवाजी पंढरीनाथ घुले, ऋषिकेश काकासाहेब गोरे आणि संदीप गोरख आगळे यांच्या विरोधात सामूहिक बलात्कार, जीवे मारण्याची धमकी, ब्लॅकमेल करणे अशा विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलीस तपास करत आहे.     
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Chikungunya crisis in Maharashtra : महाराष्ट्रावर आता चिकनगुनियाचे नवे संकट