Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नाशिकात 'महिलेने पतीची कुऱ्हाडीने हत्या करून तुकडे करून मृतदेह घरात पुरला

murder
, सोमवार, 16 जून 2025 (09:58 IST)
इंदूरच्या प्रसिद्ध राजा रघुवंशी हत्याकांडाची खळबळ कमी झाली नव्हती तोच महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातून आणखी एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे.
सुरगाणा तालुक्यातील मालगोंडा गावात, एका महिलेने तिच्याच पतीची कुऱ्हाडीने निर्घृण हत्या केली. नंतर तिने त्याच्या मृतदेहाचे तुकडे केले आणि घराच्या मागच्या अंगणात असलेल्या खड्ड्यात पुरले.चपलेमुळे ही घटना उघडकीस आल्यावर खळबळ उडाली आहे. 
 
वृतानुसार, 42 वर्षीय यशवंत मोहन ठाकरे एप्रिलपासून बेपत्ता होते त्यांची पत्नी प्रभावती ठाकरे सांगत होत्या की त्यांचे पती कामासाठी गुजरातला गेले आहे. पण 2 महिन्यानंतर देखील काहीच कळले नाही. तेव्हा यशवंतच्या कुटुंबाला संशय आला. एके दिवशी यशवंतची वाहिनी घरी आल्यावर तिला यशवंतच्या चपला दिसल्या तेव्हा संशय बळावला. यशवंतच्या वाहिनीने चपलांबद्दल विचारले असता प्रभावतीने सारवासारव करत पायाखाली लपवून ठेवल्या या कृत्यामुळे संशय वाढला. 
यानंतर, यशवंतचा भाऊ उत्तम ठाकरे याला घराच्या मागे नुकतेच केलेले खोदकाम लक्षात आले. तिथून दुर्गंधी येत होती आणि माश्या फिरत होत्या. खोदकाम पूर्ण झाल्यावर प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये शरीराचे काही भाग गुंडाळलेले आढळले. पोलिसांना बोलावण्यात आले. चौकशीत प्रभावतीने हत्येची कबुली दिली. तिने सांगितले की, 14 एप्रिलच्या रात्री तिचा नवरा दारू पिऊन तिला मारहाण करत होता आणि जीवे मारण्याची धमकीही देत ​​होता. कंटाळून तिने त्याच्यावर कुऱ्हाडीने हल्ला केला. नंतर मृतदेहाचे 3 तुकडे करून, पोत्यात भरून खड्ड्यात पुरवले.प्रभावती म्हणते की तिला तिच्या पतीकडून वर्षानुवर्षे मारहाण आणि मानसिक छळ सहन करावा लागत होता. त्या रात्री जेव्हा त्याने सर्व मर्यादा ओलांडल्या तेव्हा तिने आपला संयम गमावला आणि हे भयानक पाऊल उचलले. 
हत्येनंतर, प्रभावतीने शरीर प्लास्टिक, माती आणि कचऱ्याने झाकले जेणेकरून वास बाहेर येऊ नये आणि कोणालाही संशय येऊ नये. पण एका चपलेमुळे प्रकरण उघडकीस आले. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरले आहे. 
Edited By - Priya Dixit 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

LIVE: पुणे पूल अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना मिळणार 5 लाख रुपये,देवेंद्र फडणवीस सरकारची मोठी घोषणा