Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राज्यात पहिल्या टप्प्यात ५,३०० जागांसाठी पोलीस भरती होणार

In the first phase
, सोमवार, 11 जानेवारी 2021 (17:01 IST)
राज्यातील पोलीस खात्यात १२,५३८ जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याची माहिती अनिल देशमुख यांनी सोमवारी दिली. यात पहिल्या टप्प्यात ५,३०० जागांसाठी भरती होणार आहे. पुढे उर्वरित जागा दुसऱ्या टप्प्यात भरल्या जाणार आहेत. 
 
विशेष म्हणजे, १२,५३८ जागा भरल्यानंतरही गरज पडल्यास पोलीस खात्यात आणखी भरती केली जाईल, असेही अनिल देशमुख म्हणाले. दरम्यान, काही दिवसांपूर्वी राज्य सरकारकडून 'एसईबीसी'च्या आरक्षणाशिवाय राज्यातील पोलीस भरतीची प्रक्रिया पार पाडण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला होता. पण या निर्णयाला मराठा संघटनांकडून तीव्र विरोध करण्यात आला होता. त्यामुळे पोलीस भरती प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मुलीचे माता पिता बनले अनुष्का आणि विराट, भारतीय कर्णधाराने सोशल मीडियावरून माहिती शेअर केली