Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

धमकी आणि चितावणीखोर भाषा वापरणाऱ्या मुख्यमंत्र्यांवर ५०६ अंतर्गत गुन्हा दाखल करा – नवाब मलिक

Webdunia
लोकसभेच्या चार जागांसाठी २८ मे रोजी पोटनिवडणुका होणार आहेत. महाराष्ट्रात पालघर आणि भंडारा-गोंदिया येथे निवडणुका होत आहेत. भाजप साम-दंड-भेदाचा वापर करून निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक  यांनी केला.
 
भंडारा-गोंदिया येथे आचारसंहिता सुरू असताना धानावर पडलेल्या तुडतुडा रोगाची आर्थिक मदत मंजूर करून भाजप शेतकऱ्यांना प्रलोभने दाखवत आहे. आचारसंहितेच्या काळात सरकारी निधी वाटता येत नाही. त्यामुळे भाजपने आचारसंहितेचा भंग केला असल्याचे वक्तव्य नवाब मलिक यांनी केले. भाजपला सरळ मार्गाने निवडणुका जिंकता येत नाही त्यामुळे हे कृत्य केले जात आहे. याबाबत निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रार केली असल्याची बतावणी मलिक यांनी केली. तसेच याप्रकारचे आदेश काढणाऱ्या अधिकाऱ्यांवर निवडणूक आयोगाने तोबडतोब कारवाई करायला हवी, अशीही मागणी त्यांनी केली.
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुका जिंकण्यासाठी साम-दाम-दंड- भेदचा वापर करण्याचा सल्ला दिल्याची ऑडिओ क्लिप बाहेर आली आहे. त्या क्लिपमध्ये मुख्यमंत्री थेट धमकी देत हल्ला करा असे म्हणत आहेत. धमकी आणि चितावणीखोर भाषा वापरणाऱ्या मुख्यमंत्र्यांवर ५०६ अंतर्गत गुन्हा दाखल करा अशी मागणी नवाब मलिक यांनी केली.
 
निवडणूक आयोगाने मुख्यमंत्र्यांच्या ऑडिओ क्लिपचा तपास करावा. पोलिसांना कारवाईचे आदेश द्यावे. गरज असेल तर फॉरेन्सिक लॅबमध्ये ही क्लिप पाठवून छाननी करावी अशी मागणी करत, शिवसेनेने जनतेत जाऊन नुसती पुंगी वाजवू नये, हिम्मत असेल तर निवडणूक आयोगाकडे तक्रार करावी असे आव्हानही मलिक यांनी केले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

लातूरमधील शाळेत घुसून तोडफोड करत मनसे कार्यकर्त्यांचा गोंधळ

इस्रोचे 101 वे मिशन अयशस्वी, पीएसएलव्ही रॉकेट तिसरा टप्पा पार करू शकले नाही

LIVE: महाराष्ट्रातील 7 खासदारांना संसदरत्न 2025 हा पुरस्कार जाहीर

अजित पवारांनी लाभार्थी शेतकऱ्यांना ट्रॅक्टरचे वाटप केले

महाराष्ट्रातील 7 खासदारांना संसदरत्न 2025 हा पुरस्कार जाहीर

पुढील लेख
Show comments