अमरावती जिल्ह्याला नव्याने 28 हजार 970 कोविड प्रतिबंधक लस प्राप्त झाली असून, त्यातील 19 हजार लस 45 वर्षांवरील वरिष्ठांच्या पहिल्या व दुस-या डोससाठी वापरण्यात येणार आहे. दुस-या डोससाठी प्राधान्य देण्यात येईल. त्याचप्रमाणे, 1270 कोव्हॅक्सिन लस प्राप्त झाली असून, ती केवळ या लसीचा पहिला डोस घेतलेल्यांना दुसरा डोससाठी देण्यात येईल.
त्याशिवाय, 8700 कोविशिल्ड लस प्राप्त झाली असून, ती केवळ 18 ते 44 दरम्यान असलेल्या ऑनलाईन नोंदणी झालेल्या तरूणांना देण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले यांनी दिली. यानंतरही नव्याने लस उपलब्ध झाल्यानंतर वेळोवेळी कळविण्यात येईल, असेही ते म्हणाले.