सध्या राज्य विधिमंडळासह पावसाळी अधिवेशन सुरु आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार स्थानिक भूमिपुत्रांना न्याय मिळवून देण्यासाठी विधानभवन परिसरात शिवरायांच्या पुतळ्याजवळ एकटेच आंदोलनाला बसले आहे. कर्जतच्या जामखेड मतदार संघातील एमआयडीसी या मुद्द्यावरून हे आंदोलन केल्याचे म्हटले जात आहे. अधिवेशनात या मुद्द्याकडे सर्वांचं लक्ष जावे या साठी हे आंदोलन करण्यात आले आहे. ते म्हणाले अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत जामखेड विधानसभा मतदार संघातील बेरोजगार युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी, तसेच कर्जत जामखेडच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळावी .या साठी हे आंदोलन सुरु आहे.
भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी रोहित पवारांची भेट घेउन हा मुद्दा समजून घेतला. रोहित पवारांनी त्यांचं प्रश्न आणि मुद्दा सभागृहात येऊन मांडण्याचा सल्ला राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आणि विधानसभा अध्यक्षांनी दिला.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रोहित पवारांचं या असं आंदोलन करण्याला अयोग्य म्हटले आहे. मात्र सभागृहात या मुद्द्यावर मंत्री उदय सामंत यांनी पत्रवाचन केलं. आमदार रोहित पवारांनी मांडलेल्या मुद्द्याचा काय निर्णय घेतला जातो हे पाहावे लागणार.