Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

देशात महाआघाडीची शक्यता दिसत नाही - शरद पवार

Webdunia
सोमवार, 25 जून 2018 (10:24 IST)
मोदींविरोधात देशात महाआघाडी स्थापन करण्याच्या प्रयत्नांना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी जोरदार धक्का दिलाय. देशात महाआघाडीची शक्यता दिसत नाही त्यामुळं त्याचा चेहेरा कोण असेल याचा प्रश्नच नाही, असं शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे. एका खासगी मराठी वृत्त वाहिनीला त्यांनी मुलाखत दिली आहे. यामुळे भविष्यात भाजपा विरोधात महाआघाडी होणार नाहीत अशी चिन्हे आहेत. राहुल गांधी यांचं नेतृत्व मान्य नसेल याचेही स्पष्ट संकेत त्यांनी यातून दिले आहेत. त्यामुळे शरद पवार कोणता नवीन फासा टाकणार आहेत. हे पाहणे गरजेचे आहे. महाआघाडीची चर्चा वारंवार होत असते. महाआघाडी होणार असेल तर मी त्यात आड येणार नाही मात्र अशी शक्यता दिसत नाही. त्यापेक्षा निवडणूकीनंतर सर्वांनी एकत्र आलं पाहिजे. आधीच आघाडी तय्यार करणे गरजेचे नाही, देशातील प्रत्येक प्रदेश तेथील स्थिती अगदी वेगळी आहे. त्यामुळे महाआघाडी करताना विचार करावा लागणार आहे. राष्ट्रवादी, काँग्रेस, शेकाप, डॉ. आंबेडकरांच्या विचारांना मानणारे पक्ष एकत्र यावेत असा प्रयत्न आम्ही राज्यात करणार आहोत असे पवार यांनी स्पष्ट केले आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

नवीन

LIVE: सिद्धिविनायक मंदिरात देणगी चोरी करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश

सुनेत्रा पवार यांना मोठा धक्का! राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा अध्यक्षांसह शेकडो कार्यकर्ते शरद पवार गटात सामील

तरुण तेजपालला मोठा धक्का! बलात्कार प्रकरणात दोषी सिद्ध; मुंबई उच्च न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाचा निकाल फिरवला!

१६ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीची तुरुंगात थेट ‘पिझ्झा’ची मागणी!

वारंवार भूकंपाच्या धक्क्यांचा वैज्ञानिक अभ्यास करण्यासाठी केंद्र सरकारचे तज्ज्ञ पथक नाशिकमध्ये दाखल होणार

पुढील लेख
Show comments