Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

धक्कादायक: तेरा वर्षाच्या मुलाकडून चार वर्षीय बालिकेवर अत्याचार

Shocking: Atrocities on a four-year-old girl by a thirteen-year-old boy  Maharashtra News Regional Marathi News
, शुक्रवार, 22 ऑक्टोबर 2021 (08:18 IST)
अल्पवयीन मुलाने चार वर्षीय बालिकेवर अत्याचार केल्याचा प्रकार पिंपळगाव दाभाडी येथे घडला. पीडित मुलीवर मालेगावच्या सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असून वडनेर खाकुर्डी पोलिसांनी अल्पवयीन मुलाविरोधात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
संशयित मुलाने ओळखीचा गैरफायदा घेत बालिकेस शनिवारी खेळण्याच्या बहाण्याने घराजवळील बाथरुममध्ये नेत अत्याचार केला. बालिकेने त्रास होत असल्याचे आईला सांगितले. आईने तिला सामान्य रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासणी केली असता अत्याचार झाल्याचे दिसून आले. सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रिती सावंत यांनी पीडितेचा जबाब नोंदवत गुन्हा दाखल केला. मुलगा अल्पवयीन असल्याने त्यास आई-वडिलांच्या ताब्यात दिले. ज्युवेनाईल कोर्टात हा खटला चालविला जाईल.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पारनेर हत्याकांड : वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून बलात्काराचा गुन्हा दाखल