Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

धक्कादायक ! दिवाळीसाठी खरेदीला गेले आणि काळाने झडप घातली, हृदयविकाराचा झटक्याने व्यापाऱ्याचे निधन झाले

धक्कादायक ! दिवाळीसाठी खरेदीला गेले आणि काळाने झडप घातली, हृदयविकाराचा झटक्याने व्यापाऱ्याचे निधन झाले
, रविवार, 7 नोव्हेंबर 2021 (16:33 IST)
दिवाळीचा मोठा सण आपल्यासह आनंद आणि उल्हास घेऊन येतो. हा सण लहान आणि मोठ्यांसाठी खूप महत्त्वाचा असतो. घरोघरी या सणाची लोक आतुरतेने वाट बघत असतात. सर्वत्र आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण दिसून येते. घराघरात या सणासाठी 15 दिवसापूर्वीच जय्यत तयारी सुरु असते. बाजारपेठ तर गर्दीने फुलले असते. सणा निमित्त खरेदी करण्यासाठी सर्व बाहेर पडतात. बुलढाणा मध्ये जे काही घडले ते हृदयद्रावकच आणि धक्कादायकच आहे. सणानिमित्त खरेदी करण्यासाठी स्वस्त धान्य व्यापारी असलेले बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्याचे पळसोडा येथील राहणारे विलासमोरे हे कपडे खरेदी करण्यासाठीआसलगाव येथे हरिओम ड्रेसेस दुकानात गेले असता त्यांच्या वर काळाने झडप घातली. त्यांना तिथेच जोरात हृदयविकाराचा झटका आला आणि ते खालीच कोसळले आणि जागीच त्यांचा मृत्यू झाला. ही संपूर्ण घटना दुकानाच्या सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेमुळे मोरे कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.   

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

WI vs AUS: ख्रिस गेलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचे संकेत दिले, चाहत्यांना हातमोजे वाटले