Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

चोरट्यांनी पावभाजी विक्रेत्याच्या गॅसटाक्या चोरल्या

Thieves stole Pavbhaji vendor's Gas cylinder Marathi Regional News In Webdunia Marathi
, सोमवार, 27 डिसेंबर 2021 (15:24 IST)
दिवसेंदिवस वाढत असलेल्या गॅसच्या किमतीमुळे आता चोरट्यांनी गॅसच्या टाक्या देखील चोरी करण्याच्या घटना घडत आहेत.
 अलीकडे चोरट्यांचे काही सांगता येत नाही. ते कोणत्याही वस्तूची चोरी करतील ते सांगत येत नाही.
दिवसेंदिवस वाढत असलेल्या गॅसच्या किमतीमुळे आता चोरट्यांनी गॅसच्या टाक्या देखील चोरी करण्याच्या घटना घडत आहेत.
सावेडी उपनगरातील पाईपलाईन रोडवरील एकविरा चौकात असलेल्या पावभाजी विक्रेत्याचे दुकान फोडून चोरट्यांनी गॅसटाक्या चोरून नेल्याची घटना घडली आहे.याप्रकरणी मोहन विष्णू कोटकर (वय ३७, रा. गजराज फॅक्टरी शेजारी, गोकुळनगर, भिस्तबाग चौक) यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
कोटकर यांचे एकविरा चौकात पावभाजी विक्रीचा व्यवसाय आहे. चोरट्यांनी त्याच्या दुकानाचे शटरचे कुलूप तोडून आत प्रवेश केला.
दुकानातील दोन गॅसटाक्या, दोन लोखंडी तवे, शेगडी, सहा स्टीलचे मसाले ट्रे चोरून नेले. याप्रकरणी कोटकर यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलिस नाईक आव्हाड हे करीत आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

महाविद्यालय तरुणीवर विवाहित पुरूषाकडून अत्याचार