Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

मनसे भाजपसोबत युती करणार का? वाचा मनसे नेते नितीन सरदेसाई काय म्हणतात

मनसे भाजपसोबत युती करणार का? वाचा मनसे नेते नितीन सरदेसाई काय म्हणतात
, सोमवार, 7 डिसेंबर 2020 (16:30 IST)
मुंबई महापालिकेची निवडणूक जवळ येत आहे. मनसे भाजपसोबत युती करणार का याबाबत मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटलं की, 'फडणवीस यांनी एका वेगळ्या प्रश्नावर उत्तर देताना जे वक्तव्य केलेय यामुळे पालिका निवडणुकीसाठी त्यांनी हात पुढे केलाय की नाही हे आत्ताच सांगत येणार नाही. याबाबतचे निर्णय राज ठाकरेच घेत असतात, याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही.'
 
पुढे त्यांनी म्हटलं की, 'मनसेचा जन्मच भूमिपुत्रांसाठी, मराठीसाठी झालाय, यामुळे याबाबत कोणालाही शंका घ्यायचं कारण नाही, अमराठीचा मुद्दा हा गैरसमजातून आलाय, मराठीचा आदर अमराठी लोकांनी करावा, आम्ही काही मुद्दाहून कोणाला मारहाण करत नाहीत. मराठीचा मुद्दा मनसे कधीही डावलणार नाही.'
 
मनसे आणि भाजपची युती झाली तर राज्याच्या राजकारणात नवी समीकरणं तयार होण्याची शक्यता आहे. जानेवारीमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर भाजप-मनसेच्या युतीची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली होती. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

शिवसेनेचा शेतकऱ्यांच्या भारत बंदला पाठिंबा