साहित्य : तीन कच्ची केळी, अर्धी वाटी भिजलेले हरभरे, किचित मीठ घालून वाफवून, वाटीभर ओलं खोबरं, चार सुक्या लाल मिरच्या, हळद, मीठ, एक कांदा ७/८ मिरे, दोन लवंगा, दोन चमचे धणे, अर्धा डाव तेल, चिमूट साखर.
कृती : चणे-हरभरे रात्री भिजत घालून सकाळी वाफवावे. केळीची साल काढून जरा मोठ्याच फोडी कराव्यात. खोबऱ्याच्या चवात मिरची धणे, मिरे, लवंग व हळद घालून वाटून मसाला बनवावा. पॅनमध्ये तेल घालून कांद्याच्या फोडी टाकून परताव्यात. त्यावर केळीच्या फोडी घालाव्यात थोडसं पाणी व मीठ घालून शिजू द्याव्यात. केळी शिजली की वाफवलेले चणे, वाटलेला मसाला घालून डावाने हलके हलवावे. चवीपुरती साखर घालावी व भाजी उकळू द्यावी.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात.....
आणखी वाचा