Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

इम्युनिटी वाढवण्यासाठी भारतीय परंपरेच्या 5 टिप्स अमलात आणा

इम्युनिटी वाढवण्यासाठी भारतीय परंपरेच्या 5 टिप्स अमलात आणा
, मंगळवार, 8 डिसेंबर 2020 (11:51 IST)
सध्या सर्वत्र कोरोनाने उच्छाद मांडला आहे. कोरोना विषाणू खूपच प्राण घातक आहे, परंतु या मधून हजारो संक्रमित देखील बरे झाले आहेत. जर आपण वर्दळीच्या ठिकाणी जाणं,लोकांना भेटणं थांबविले आहे  तर या विषाणूंपासून वाचण्याचा एकमेव उपाय हाच आहे. या शिवाय भारतीय संस्कृती,परंपरा आणि आयुर्वेदात अशा बऱ्याच उपाय आणि सूचनांचा उल्लेख करण्यात आला आहे, ज्या द्वारे आपण आपली प्रतिकारक शक्ती वाढवू शकतो.   
 
1 उपवास - संपूर्ण एक दिवसाचा उपवास केल्यानं आपल्या शरीरातील जंत आणि विषाक्त पदार्थ काढून आपली रोग प्रतिकारक शक्ती वाढवतो. जर आपण वृद्ध नसाल तर या उपवासाच्या काळात नारळाचे पाणी घ्या आणि एक बाळ हरड घ्यावे.बाळ हरड चावायची नसून चघळायची आहे.हे आपल्या शरीरातील टॉक्सिन किंवा विषारी पदार्थ बाहेर काढतं.
 
2 प्राणायाम - प्राणायाम केल्यानं आपल्या फुफ्फुसांची क्षमता वाढते. कोरोनाचे विषाणू सर्वप्रथम आपले फुफ्फुसांना संसर्गित करतो. या मुळे श्वास घेण्यास अडचण येते. जर आपले फुफ्फुस सक्रिय आणि बळकट असले तर आपण या विषाणूंवर मात करू शकतो. आपण घरात बसून देखील पूरक म्हणजे श्वास आत घेण्याची प्रक्रिया कुंभक म्हणजे श्वास रोखून ठेवण्याची प्रक्रिया आणि रेचक म्हणजे श्वासाला हळुवार सोडण्याची प्रक्रिया. पूरक, कुंभक आणि रेचकच्या प्रक्रियेला चांगल्या प्रकारे समजून दररोज हे प्राणायाम केल्यानं रोग बरे होतात. या नंतर आपण भ्रस्त्रिका, कपालभाती, शीतली, शीतकारी आणि भ्रामरी प्राणायाम समाविष्ट करावं. हे आपल्या रोग प्रतिकारक शक्तीला वाढवतो.
 
3 तुळशी रस - बहुतेक सर्व घरातच तुळशीचं रोपटं असत. त्याचे बरेच फायदे आहेत. हे सर्व रोगाणूंना घरात येण्यापूर्वी नष्ट करतात. याच्या नियमितपणे सेवन केल्यानं कोणते ही गंभीर आजार होत नाही. हे आपल्या रोगांशी लढण्याच्या शक्तीला वाढवतो. तुळशीच्या व्यतिरिक्त आपण गिलोय किंवा कडू सेलिसिलिक चा रस दररोज अर्धा कप घेऊ शकता. परंतु ह्याचे सेवन जास्त प्रमाणात करू नये.आवश्यकतेनुसार आठवड्यातून दोनदा घ्यावे. किंवा आयुर्वेदिक तज्ज्ञाच्या सल्ल्यानुसार घ्यावे. तुळशीच्या सह आलं, काळी मिरी आणि मध योग्य प्रमाणात मिसळून प्यायल्यानं देखील रोग प्रतिकारक शक्ती वाढते.
 
4 सूर्य नमस्कार - आपण दररोज घरातच सूर्य नमस्काराच्या 12 चरण 12 वेळा करावे. या मुळे आपण सर्व प्रकारे फीट किंवा निरोगी होऊन रोगांशी लढण्यासाठी सज्ज व्हाल.  असे म्हणू शकतो की कोणतेही विषाणू आपल्यावर परिणाम करणार नाही.

5 शाकाहार स्वीकारा - पूर्णपणे शाकाहारी जीवनशैली अवलंबवा आणि सूर्यास्ताच्या पूर्वीच जेवण करा. आयुर्वेदानुसार सूर्यास्ताच्या पूर्वीच जेवण करावं.जैन धर्मात या नियमाचे खूप महत्त्व आहे. सूर्यास्तापूर्वी जेवण केल्यानं पचन क्रिया चांगली राहते. अन्नाला पचण्यासाठी सकाळपर्यंतचा पुरेसा वेळ मिळतो. सूर्यास्ताच्या पूर्वी जेवण केल्यानं व्यक्ती अनेक आजारांपासून वाचतो, कारण रात्री आपल्या अन्नात अनेक जंत चिटकून राहतात किंवा आपोआपच उद्भवतात. रात्र सुरू होताच अन्न शिळं होत आणि दूषित होण्याची प्रक्रिया सुरू होऊ लागते. चांगले अन्नच आपल्याला जंतांशी लढण्याची सुरक्षा आणि हमी देत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

SBI Recruitment 2020: SBI मध्ये अप्रेंटिसची भरती, 10 डिसेंबर पूर्वी अर्ज करा