राज्यात गेल्या २० दिवसात कोरोनाचे ८४ हजार ११८ रुग्ण बरे झाले आहेत. याकाळात दिवसाला सरासरी ४२०० रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. सोमवारी ५४६० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५४.९२ टक्के असून आतापर्यत एकूण संख्या १ लाख ७५ हजार २९ झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या ८२४० नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात १ लाख ३१ हजार ३३४ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
पाठविण्यात आलेल्या १६ लाख ६६७ नमुन्यांपैकी ३ लाख १८ हजार ६९५ नमुने पॉझिटिव्ह (१९.११ टक्के) आले आहेत. राज्यात ७ लाख ६५ हजार ७८१ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४५ हजार ४३४ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
राज्यात सोमवारी १७६ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.७७ टक्के एवढा आहे.
राज्यात नोंद झालेले १७६ मृत्यू हे मुंबई मनपा-४१, ठाणे-५, नवी मुंबई मनपा-११, कल्याण-डोंबिवली मनपा-११, उल्हासनगर मनपा-६,वसई-विरार मनपा-२, रायगड-४,पनवेल-२,नाशिक मनपा-२, धुळे मनपा-१, जळगाव-१८, जळगाव मनपा-३, पुणे-९, पुणे मनपा-२२, पिंपरी-चिंचवड मनपा-११,सोलापूर-१, सोलापूर मनपा-४, सातारा-२, कोल्हापूर-४, सांगली-४,औरंगाबाद मनपा-३, जालना-१,लातूर-२, नांदेड मनपा-२, अमरावती-१, अमरावती मनपा-१, बुलढाणा-२, वर्धा-१ या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील तर इतर राज्य १ अशी नोंद आहे.