मुंबईच्या दादरजवळच्या माटुंगा रेल्वे स्थानकाजवळ एकाच रेल्वे ट्रॅकवर दोन एक्सप्रेस गाड्या समोर आल्याने अपघात झाला आहे. मध्य रेल्वेच्या प्लॅटफॉर्म नंबर 5 वर हा सर्व प्रकार घडला आहे. मध्य रेल्वेच्या दादर स्थानकावर गदग एक्सप्रेस- पाँडेचरी एक्सप्रेस आमनेसामने आल्या आहेत. या अपघातात एक्सप्रेस गाडीचे 3 डब्बे घसरले आहेत. सुदैवाने या अपघातात कोणत्याही घातपाताची माहिती समोर आलेली नाही. या सर्व प्रकारामुळे मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झाला.
"या अपघातात आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. तसेच कोणाला दुखापतही झालेली नाही. दादरवरुन पाँडेचरीच्या दिशेने 11005 या क्रमांकाची एक्सप्रेस निघाली. या एक्सप्रेसच्या मागे सीएसएमटी-गडक ही एक्सप्रेस गाडी होती. या एक्सप्रेसच्या लोको पायलटने पाँडेचरी एक्सप्रेसच्या मागील डब्ब्यांना धडक दिली. या धडकेत 3 डब्बे घसरले", अशी माहिती मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिली.